02 August, 2012

वाढदिवस,
दिवाळी नसताना देखील आईकडुन शिकेकाईने धुऊन घेतलेले केस.

वाढदिवस,
आजीने केलेलं मायेचं औक्षण.

वाढदिवस,
मैत्रीणींबरोबर खाल्लेली भेळ.


वाढदिवस,
"अहों" नी आणलेल्या भेटीचं अप्रुप.

वाढदिवस,
"हॅप्पी बत्दे अज्जु" म्हणत गळ्यात पडलेले नाजुक हात.

वाढदिवस,
नचिकेताला भेटण्याची तीव्र होत जाणारी ओढ...

--
मृणाल भिडे.
2 ऑगस्ट 2011

3 comments:

  1. तुमचा नुकताच वाढदिवस झाला असेल किंवा आज असेल तर शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. बुकशेल्फ आवडले.घरीही बराच संग्रह असेल..

    ReplyDelete
  3. खूप सुंदर आणि अतिशय नेटकी रचना

    ReplyDelete