In search of myself!

माणसाचं मनही इतकंच नितळ असतं तर...


जगात अनाकलनीय असं बरंच काही घडत असतं.
हाती असलेल्या, नसलेल्या, निसटुन गेलेल्या क्षणांकडे
आपण
अगतिक होऊन,
हताश होऊन पाहात राहतो...

विचारांच्या मागे आपली फरफट होत राहते...
आपली म्हणजे नक्की कोणाची?
मनाची कि बुद्धीची????
अस्वस्थ होऊन अलगद व्यक्त होत राहतं....
कधी ठळक, रेखीव...
कधी अंधुक...
कधी कॅनवासवर....
कधी शब्दातून....
कधी फोटोतून....
कधी स्पर्शातून
मात्र कधीतरी असंही होतं....
....
बेटं काही सांगतच नाही....
असंच घुसमटत राहतं ...आतल्या आत....

बाहेर अथांग... अमर्याद पसरलेलं विश्व ....
पशुतल्या माणुसकीचं, माणसातल्या पशुचं.....
अर्थ लावत राहतं प्रत्येक अनाकलनीय घटनेचं....
स्वतःचं अस्तित्व शोधत राहतं... या जगड्व्याळ पसार्‍यात...


आणि पुन्हा एकदा नव्याने पेटुन उठतं.
नव्या आशा उरी बाळगुन...

नव्या आकांक्षापुर्तीसाठी वाटचाल करत राहतं...
जुन्या कडु-गोड आठवणींची जाण ठेवुन...
अधिक सजगतेने... अधिक जोमाने...