एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी...
(सालं इथे मी एकटा जरी बाईकवर बसलो तरी ही केकटत असते...एकदा धडपडलास ते पुरे नाही का?)
नी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !
एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी.
(महा बावळट ध्यान आहे!)
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !
(ते सांगायला लागत नाही... खिदळखापरीच आहे नाहीतरी...)
एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
(हे स्वप्न कधी पुरं होईल? जाम नखरे आहेत अंगात! काय जगाची उस्तवार करते कोण जाणे?)
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !
एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..
(दर दुसर्या मिनिटाला होणारी आणि पाचव्या मिनिटाला संपणारी भांडणं!
नाही झालं तरच तो अपवाद! आणि मोठ्या हिरिरीने भांडते...)
एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर...
एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा...
एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात...
(बापरे! इतका विश्वास टाकायचा तिच्यावर? आधीच डोक्यावर बसलीय... अजुन शेफारेल!!)
16 June, 2011
06 June, 2011
रीलेशनशिप
"... प्रत्येक नात्याची आपली एक डिमांड असते. मागणी असते. किंवा असं म्हण की दोन माणसांच्या सह-अस्तित्वात जेव्हा अपेक्षा, मागणी निर्माण होते तेव्हाच नात्याचा जन्म होतो. त्या मागणीला प्रतिसाद देता तेव्हा तुम्हाला ते माणूस आवडायला लागतं. आणि नात्याची मागणी शंभर टक्के पूर्ण करणं म्हणजे प्रेम करणं. मुख्य म्हणजे हे लक्षात घे रेणू, मी मागणी नात्याची म्हटलं, दुसर्या माणसाची नव्हे.
--
नचिकेताचे उपाख्यान.
संजय भास्कर जोशी"
...
सगळं हातातुन निसटत चाललंय असा भास होत असताना हे पुस्तक वाचलं...त्या काळात अनेकदा वाचलेलं हे पुस्तक आज हातात घेतलं की कधी कधी वाटतं सालं काय आहे ह्या पुस्तकात असं खास. फालतु पुस्तक आहे... पण ह्याच पुस्तकाने खुप आधारही दिलाय... नात्यांचे नवीन कंगोरे सापडले... विशेषतः मैत्रीचा नवीन अर्थ सापडला... अरेच्चा! असंही असु शकतं?
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक नात्याचा विचार करताना जाणवत राहतं, की खरंच आपण किती अपेक्षा वाढवुन ठेवतो. लहानपणी आई-वडिलांकडुन, अजुन थोडं मोठं झाल्यावर अगदी शाळेतल्या आपल्या लाडक्या बाईंकडुन देखील... :D मग विश्व विस्तारत जातं आपलं आणि इथेच सारं बिनसत जातं. प्रत्येक नात्याची मर्यादा असु शकते हे त्या फुलपंखी दिवसांत कळत नाही किंवा कळत असलं तरी आपला अहं इतका ताठर असतो की त्यापुढे सगळी सायकॉलॉजी शुल्लक वाटत असते...
मागणी नात्याची असली तरी हे नातं दोन माणसांमध्येच होतं. मग नक्की कोणाची अपेक्षा असते हे नातं समोरच्याने पुर्णार्थाने निभवावं अशी? जो ह्या नात्यात निरपेक्षपणे नकळत गुंतत जातो त्याची की ज्याने फक्त स्वार्थासाठी हे नातं जोडलंय त्याची?? मुळात एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणं ही कल्पनाच इतकी वास्ट आहे आणि प्रगल्भही. पण माझ्या कठीण काळात एका अनामिक नात्याने मला भक्कम आधार दिलाय, पुन्हा एकदा आत्मविश्वासाने जगायला बळ दिलंय, जेव्हा आपले म्हणवणारे निष्ठुरपणे तोडलं होतं तेव्हा अनपेक्षितपणे या नात्यात मी गुंतत गेले.
पण आज वरचं वाचताना वाटतं आज जे जगावेगळं, उफराटं नातं मी अनुभवतेय, त्या नात्यामध्ये आम्हांला सह-अस्तित्वाची कधीच गरज लागली नाही, पुढे लागेल असं वाटत नाही. असं असतानाही मी प्रचंड पझेसिव्ह आहे त्याच्याबाबतीत. कोणत्याही क्षणी संपु शकतं हे नातं... हातातुन जितक्या सहजतेने वाळु निसटुन जाते तितक्या सहजतेने.
मग हे नातं नाही का? नाही तर नक्की काय आहे हे?

05 December, 2010
शांततेलाही आवाज असतो...
ज्यावेळेस ड्रायव्हरला विचारलं त्यावेळेस तो आधी चक्रावुन गेला. मला ‘औट’ माहिती आहे. पुढचं तुम्ही इथे या मग बघु असं वरवर म्हणाला असला तरी तो मनात मात्र वैतागला असणार हे लगेच लक्षात आलं. हे लोक मॅप्स घेऊन येतात आणि कुठले कुठले स्पॉटस् शोधुन काढतात या गोष्टीची त्याला गेल्यावेळेस नेहमी मजा वाटायची. तसंच यावेळेस झालं. तिथे पोचल्यावर त्याने त्याच्या ‘दोस्तलोगों’ ना विचारल्यावर निम्म्या लोकांना माहिती नव्हतंच आणि ज्यांना माहिती होतं त्या प्रत्येकाने काय विचित्र कस्टमर आहेत असा भाव चेहर्यावर दाखवला आणि रस्ता खराब आहे जाऊ नका असंही वर सांगितलं. पण आम्ही मात्र आमच्या निर्णयावर ठाम होतो. ते पाहिल्यावर ड्रायव्हरला हो म्हणावंच लागलं तिथे पोचल्यावर मात्र तोही खुप खुश झाला. ‘बहोत अच्छा लगता है’ असं वारंवार त्याने बोलुन दाखवलं.
थोड्यावेळाने खाली गेस्ट हाऊस ला गेल्यावर मालकाने पेट्रोल आणलं होतं. ते भरुन मोठा सुटकेचा श्वास टाकला. संध्याकाळी मागच्या व्हरांड्यात मालकाशी बोलत असताना खुप मजेशीर माहिती कळली. शोजा हे गाव पर्यटन स्थळ म्हणुन नकाशावर आलं ते ब्रिटीशांमुळे. सिमल्याला राहणारे ब्रिटीश ऑफिसर्स रिकाम्या वेळात आजुबाजुच्या गावांमध्ये भटकत राहायचे. त्यापैकीच एका ब्रिटीश ऑफिसरला हे गाव बेहद्द आवडलं आणि या गावाला डांबरी रस्ता मिळाला. त्याच डांबरी रस्त्याची भारत सरकारने नाममात्र डागडुजी केलेली आहे. आम्ही त्याविषयी हळहळ व्यक्त करताच मालक म्हणाला, “रस्ता चांगला नाहीय तेच उत्तम आहे. म्हणुनच इथली शांतता टिकुन आहे. कारण सिमल्यावरुन मनालीला जाणारा हा रस्ता तुलनेने जवळचा आहे. हा रस्ता नीट झाला तर या रस्त्याला असणारी अवघड वळणं काढुन टाकली जातील आणि हे दिल्ली-पंजाबवाले गाड्या सुसाट सोडतील. त्यापेक्षा आहे हे उत्तम. आणि बर्फाच्या काळात मात्र हा रस्ता बंदच असतो. त्यामुळे तो फार काही नीट होणार नाही असं वाटतंय, निदान लगेचच्या काळात तरी...!!”
30 October, 2010
मनाली-रोहतांग पास
सिमला-कुलु-मनाली अशी टुर 4-5 वर्षापुर्वी केली असली तरी त्यावेळेस अम्ही एप्रिल महिन्यात गेलो होतो. त्यामुळे रोहतांग पास पर्यंत वर जाता आलं नाही.म्हणुन खास रोहतांग पास साठी जुन मध्ये जायचं ठरवलं.
रोहतांग पास मध्ये आल्यावर मात्र स्वर्ग दोन बोटं उरला... चारही बाजुंनी हिमशिखरं... अधिका अधिक थंड आणि बोचरी होत जाणारी हवा... सोसाट्याचा वारा...वळणं घेत घेत केलोंग कडे (लाहोल-स्पिती) जाणारा रस्ता... उतारावरुन उतरत जाणार्या मेंढ्या... थोड्या-थोड्या वेळाने दिसणारे आर्मी-ग्रेफ चे ट्रक्स्... अप्रतिम वाटत होतं. प्रभाकर पेंढारकर यांनी लिहिलेल्या रारंग-ढांगाचं, किन्नोर-कैलास शिखराचं वर्णन सतत डोळ्यासमोर येत होतं... रोहतांगपास ही त्याची झलक होती. दोन-तीन तास थांबुन, मनसोक्तपणे निसर्ग डोळ्यात साठवुन परत निघालो...
28 October, 2010
परतीचा प्रवास
आज थिम्फु मध्येच भटकायचं असल्याने सावकाश उठलो... धोबीघाट उघडला... रविवार असल्याकारणाने सगळी पर्यटकी स्थळं बंदच होती. भुतानचं राष्ट्रीय ग्रंथालय पहाण्याची खुप उत्सुकता होती. मात्र तेही बंदच होतं. मग काय असंच गावात भटकलो. आणि खोलीवर परतुन गाढ झोपलो.
भुतान वरुन परत येताना भारत-भुतान सरहद्दीवरचं गारुमारा नॅशनल पार्क पाहिलं... मस्त निवांत दोन दिवस जंगलात राहिलो... भटकलो... पाहायला खास असं काही मिळालं नाही.. अर्थातच अपेक्षा नव्हतीच! येताना गारुमारा-हावडा बस प्रवास, हावडा-मुंबई विमान प्रवास आणि घरी... सोबत सुंदर आठवणी!!!
Subscribe to:
Posts (Atom)