09 June, 2010

दिल ढूंढता है.फिर वहीं.. फुरसत के चार दिन...

वर्षभर नको इतकी (जरा जास्तच्) मेहनत केल्यावर (अभ्यासाची!!) मला गुलजारचं गाणं फारच आठवायला लागलं आणि फेब्रुवारीत भुतानचा विचार पक्का झाला...

आता भुतानच का? सगळ्यात पहिलं आनि अतिशय महत्वाचं कारण म्हणजे ते टिपिकल पर्यटकी ठिकाण नाहीय. त्यामुळे हवीहवीशी वाटणारी शांतता आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्य अशा दोन महत्वाच्या (म्हणजे माझ्या दृष्टीने महत्वाच्या) गोष्टींसाठी भुतान प्रसिध्द आहे. थिम्फु, पारो, पुनाखा, भुम्थांग ही गावं सोडली तर पाहण्यासारखं काही नाही. पारोचं राष्ट्रीय संग्रहालय आणि तत्संग मॉनेस्ट्री, पुनाखाची मॉनेस्ट्री, थिम्फु शहरातील पर्यटकी ठिकाणं... बास!! यादी इथेच संपते. भुतानचं सुती कापड, मास्क वगैरे गोष्टी विकत घेण्यासारख्या आहेत. पण त्यासाठी आपल्या खिशात भरपुर पैसा हवा. बाकी बरंच काही विकत घेण्यासारखं आहे. मोहात पाडणारं आहे. पण त्या सर्वच गोष्टी चीन, बांगलादेश आणि भारतामधुन आयात होतात. साहजिकच त्यांची किंमतदेखील वाढते. अन्यथा या गोष्टींचं नेत्रसुख अतिउत्तम!! पण ही यादी ज्यांना काय काय बघितलं आणि काय काय खरेदी केली ह्याचा गावगोंगाट करायचा मोह असतो... हौस असते त्या लोकांसाठी....

आणि ज्यांना निरर्थक भटकायचं आहे... मन मानेल तसं... आणि घरी परतल्यावर “हं,जरा फिरुन आलो.. नवीन प्रदेश पाहीला.. नवीन माणसं ‘वाचली’...” इतकंच सांगायचंय... त्यांना भुतान फिरायला 1 महीना सुध्दा कमी पडेल...

भुतानला जाताना आपल्या भारतीयांना फक्त मतदार ओळखपत्र असणं अत्यंत गरजेचं असतं. त्याआधारे फुंटशोलिंगला (भारत-भुतान हद्दीवरील भुतान मधील गाव) फक्त थिम्फु आणि पारो या दोनच गावांसाठी प्रवेश परवाना तयार केला जातो. इतर गावांसाठी प्रवेश परवाना थिम्फु वरुन केला जातो. मतदार ओळखपत्र नसेलच तर ड्रायविंग लायसन्स, पॅन ओळखपत्र आणि शासकीय नोकरीत असाल तर तेथील ओळखपत्र असणं गरजेचं असतं. लहान आणि कॉलेजवयीन मुलांसाठी देखील छायाचित्र असलेलं ओळ्खपत्र लागतं. पासपोर्ट असलाच पाहीजे असं काही नाही... विसा लागत नाही.... तिथे फिरायला भुतान सरकारने ठरवुन दिलेल्या दराप्रमाणे गाड्या उपलब्ध असतात. लहान मोठ्या सगळ्या प्रकारच्या. साधारणपणे 7-8 दिवसाचे 10 ते 14 हजार असे भाडे आकारले जाते (सिटींग कपॅसिटीप्रमाणे). थिम्फु, पारो शहरात बरीच हॉटेल्स आहेत. 500 ते 1400 असे दर आहेत... थोडक्यात भटक्या जमातीच्या सहपरीवार- सहकुटुंबाची फिरण्याची छान सोय आहे... हा फक्त शाकाहारी आणि दारुला न शिवणार्‍या लोकांची जरा पंचाईत होते ती म्हणजे त्यांना झक मारत बार असलेल्या हॉटेलमध्येच जेवावं लागतं... आणि जेवताना खाण्या-पिण्याचे फारसे चोचले करुन चालत नाहीत... प्रत्येक हॉटेलला बार आहेच. असे असले तरी तेथील स्थानिक लोक झिंगुन मात्र फिरताना मात्र आढळले नाहीत...

4 comments:

 1. आणि फोटो कुठेत?? पुढच्या वेळी फोटो नसतील तर आम्ही वाचणार नाही (आत्ताच सांगून ठेवतो....हां...!!!...माझी काहीही हरकत नाही हे वाक्य आतातरी वापरू नकोस..!!)
  भुतानमध्ये पासपोर्ट, व्हिजा नसला तरी चालते ही माहिती महत्वाची आहे.
  --------------------------------------------------------------
  दारु मुक्त हस्ताने का उपलब्ध आहे याचं कारण समजुन घेण्याच्या फंदात मी पडले नाही.
  -------------------------------------------------------
  काय हे? एवढ्या लांब जाऊन....चव तरी घ्यायची ना मग. नाहीतर आम्हाला आणायची थोडीशी.

  आणि हो, लोक प्रवासवर्णनं वाचकांना वाचून-वाचून झीट येईल एवढी मोठी लिहितात, आणि तु मात्र अनसीन पॅसेज लिहितेयस....ते काही नाही... पुढच्या वेळी लांबी वाढवा...

  ReplyDelete
 2. फोटो पोस्टच्या ओघाने येत जातीलच... आणि भुतानची तोंडओळख या विषयावर इतकं पुरेसं आहे. खरा प्रवास अजुन सुरु कुठे झालाय?

  ReplyDelete
 3. ओके...ही पोस्ट मराठीब्लॉगनेट.इन वर का दिसली नाही..? तु अजुन तिथे ब्लॉग जोडला नाहीस का?

  ReplyDelete